प्रीत खुळी
एक हुंदका कुशीतला निश्वास सांडला आकाशी
वादळ विरले उरले लाघव हिरवळले चंद्रापाशी
उलगडल्या सावल्या नाचल्या रास जणू हृदयी कोषी
अवसेकाठी पुनव रंगली ना कळले अवचित कशी
कळा मिळाल्या ऋतुपर्णांना गंध कळ्यांना ह्या वेळी
मेघ दाटल्या नभओळी अंगणी रंगली रांगोळी
वलय शहारा अंकुरला ओठांवर खळखळ ओघळली
जातकुळी ही प्रीत खुळी रुधिरावर अलगद पागोळी
……………………… अज्ञात

No comments:
Post a Comment