वाऱ्यात कसा ओलावा ? ... विश्वात विकल का कोणी ?
आकाश कुंद भरलेले …. कल्लोळ कसा हा भानी ?
थांबले चराचर अवघे …. गूढात वेढली अवनी
जलधीत कशास उसासे ?…. पाण्यास शोधते पाणी
अंधार इथे स्वप्नांचा…. सण हिरवा त्यात विराणी
अदृष्य उरातिल वेणा…. संमोहन त्रेधा करणी
अस्पर्श गहन पाशांची…. रुधिरात लागते वर्णी
आधाराविण वळते पाउल…. ओघळते एक कहाणी
ह्या वृथा कशाशा आठवणी…. मन निबिड अशांत घराणी ?
ओळखून रस झुळुकेचे…. पक्षी आळवती गाणी
ऋतु संभव कैसे आकारणे…. शून्यास दान कांचन वाणी ?
पाहता रिक्त वाटेल खरे पण…. कथा रमल ही चैत्रखणी
…………. अज्ञात

No comments:
Post a Comment