माझे आदरणीय आदर्श तीर्थरूप वडील ल्क्ष्मण विष्णुपंत कुलकर्णी यांना २० नोव्हेंबर रोजी राहत्या घरी अकस्मात देवाज्ञा झाली. वयाच्या नव्वदीतही शेवटच्या क्षणापर्यंत ते स्वावलंबी, आत्मनिर्भर अणि दैनंदिन व्यावसायिक तसेच कौटुंबिक कार्यक्रमात व्यस्त होते. वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी नव्या लुना वरून नाशिक -पुणे -आळंदी -नाशिक एकट्याने सफर केली होती. वयाच्या चौ-याशिव्या वर्षी ते नियमित क्लास लावून कार शिकले आणि लायसन्स मिळवले. आता त्यांना स्वत:ची कार घेऊन चालवायची होती. गेल्याच वर्षी त्यांनी अंदमान सफर केली. त्याआधी त्यांची आमच्या आई सोबत दुबई वारी झाली.
प्रचंड वाचन आणि अध्यात्मिक वातावरणात ते रममाण असत.
आमची आई, दोन मुलगे, दोन मुली, दोन नातू , चार नाती, चार पणतू , एक पणती अशा गोतावळ्यात ते आनंदी होते. तीन पणातवांच्या मौंजीत त्यांचा प्रत्यक्ष उत्साह सर्वांना आचंबित करून गेला.
१९ नोव्हेंबरला नेहमीप्रमाणे दुपारच्या जेवणानंतर ते त्यांच्या व्यवसायाच्या दुकानी स्कूटीवरून गेले. नियमित कामे केली. गोठ्यावरून सायंकाळचे दूध आणले. रात्रीचे जेवण घेतले.
रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांना श्वास लागला. माझ्या मनमाड स्थित हृदयरोग तज्ञ डॉक्टर भावाने सांगितलेली औषधे घेतली, आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केलं पण उपयोग झाला नाही.
आज ते प्रत्यक्ष ह्या जगात नसले तरीही त्यांचं अस्तित्व , त्यांच्या आदर्श आचरणाने आम्हाला दिलेल्या शिकवणीतून, असंख्य आठवणींतून आणि त्यांच्या कर्मयोगी जीवनप्रणालीद्वारे आमच्यात चिरंजीव राहील.
मात्र त्यांच्या हरवलेल्या सहवासाची पोकळी आता आमच्या अखेरपर्यंत तशीच राहील.
मळभ खळे ना श्वास दाटले मेघांनी,….
खळबळले, ढवळल्या कथा पुनवेस उसवल्या लाटांनी
अंदाज कसे चुकले बावरले ऋतू कोंडल्या वाऱ्यांनी
आभाळ कडे कोसळले कढ झेलले पोरक्या हातांनी
कोणास न कळले मरण जिंकले केंव्हा, …
मावळले सण आवळल्या सावल्या कराल पाशांनी
थरथरले नभ सहवास नि माया मूढ जाहली काया
धावले जीव परतले रिते भिजवीत चंदनी छाया
…………………… अज्ञात

No comments:
Post a Comment