Thursday, 2 January 2014

भरारी

घेत भरारी गगन विहारी विहंग मन प्रतिमा कोरी
वेध दिशांचे युगे युगे जन्मो जन्मी विस्मयकारी
अशक्य कोटी असंख्य नाती गुंता अनुनय गाभारी
अन्वय शोध बिचारे अगणित चुकार भाषा व्यभिचारी

गाळिवशा रिपुकांच्या भिंती रोप पेरती अविचारी
किती करावे थोडे ते तृप्ती न कधीच महाद्वारी
द्यावे घ्यावे विसरावे परतून न यावे माघारी
निववेल कुणी इच्छा वांच्छा थांबेल कधी का ही वारी ??

………………………. अज्ञात

1 comment:



  1. सुपर्ब!

    काजळ वाटा धूळ फ़ुफ़ाटा दिशा व्यापल्या दाही>> सुंदरच
    सुकलेला पाचोळा भिरभिर उडवत वारा वाही>> ह्या कडव्याअंती एक चित्र उभं राहतं डोळ्यासमोर. मग आपण सावरून बसतो... चित्र कसं कसं रंगत जाईल ही उत्सुकता असते

    अंध मोहरे काळे गहिरे पोत मानवत नाही>> मी रेंगाळलेच इथे. पोत मानवत नाही... वाह!
    वठलेल्या रेषांचे व्रण अवशेष वाहती भोई>> आई गं
    पराधीन मायामय जीवन झुळुक वादळे तीही> झुळुक वादळे! मेड मी थिंक अ लॉट!
    ओहटीत कवने वचनांची जगणे लाट सदाही>> रंगत जातं चित्र. जरा डर्क शेडस आहेत, पण मोहक.

    उलगडणे वाळूसम काठावर लोटांगण घेई, खोल तळातिल दडलेले सागर पृष्ठावर येई>> स्पीचलेस.
    फेस दुधी विरघळे उफाळे फुटे अंगभर लाही
    श्वासांचे दळणे आदळणे चिर अंदोलत राही
    >> अल्टिमेट. कुठेतरी समुद्रकिनारी भूरभूरल्या वाळूत पायाशी फुटणार्‍या लाटा बघत अंधारात हरवते नजर. मग लाटांची गाज आणि श्वासांचा गहिवर.

    सगळं काही मिळूनही खूप काही निसटत गेल्याची, फोलपणाची जाणिव, एक अनुभव.
    धन्यवाद.

    ReplyDelete