खार्या निरुपयोगी अथांग समुद्रातला थेंब !,
आदित्याच्या ऊग्र तेजात तावून सुलाखून शुध्दोदकाचा प्राण होऊन वरुण दरबारी रुजू होतो. मध्यतळातून काठापर्यंत; आकाशाला वेधत उसळणारा अस्वस्थ जीव, हुरळून जातो मेघात. सीमाच नसते त्याच्या फिरण्याला आता. ऊन सावल्यांच्या खेळात निरनिराळी रुपं धारण करू शकत असतो तो, स्वैरपणे, खोल निळ्या आकाशात. पंखांबरोबर सात रंगही मिळालेले असतात त्याला उधळ्ण्यासाठी, वरदानात. अंत नसतो दिशांना. वार्याच्या खांद्यावरून वहातांना, आधाराशिवाय तरंगतांना, किनार्याशिवाय पिंजतांना, प्रयत्नांशिवाय उसळतांना, त्याला विसरायला होतं स्वतःलाही.
एके दिवशी वाराच थांबतो वहायचा आणि प्राण कोसळू लागतो खाली - पृथ्वीकडे; पुन्हा अनिर्बंध वेगाने. धडपडीत आदळतो-दळतो-गडगडतो-जळतो-कडकडतो, चमकून बघतो तो काय !!.., एका प्रचंड पर्वताने रस्ताच आडवलेला असतो पुढे जाण्याचा. त्याच्या भरकट्ण्याला लगाम घातलेला असतो पूर्णपणे.
आज त्याला प्रथमच जाणीव होते त्याच्या निर्जीव्-निष्प्रभ अस्तित्वाची. गरजेपोटी गरज निर्माण होते सावरणार्या आधाराची; अडचण झेलण्यार्या मातृत्वाची, निश्चित आणि योग्य दिशा दाखवणार्या दातृत्वाची. तो डोळे गच्च मिटून घेतो आणि धावा करतो माहेरचा; पुन्हा कुशीत घेण्यासाठी.
पाऊल टेकताच जमिनीला झालेला आनंद, स्पर्शात उमललेला शहारा तो अनुभवत असतो. असमंतात दाट भरलेला सुगंध, त्याच्याशी इतरांच्या असलेल्या रुणानुबंधांची आठवण करून देत असतो. अशातही तो वहात सुटतो; वाट फुटेल तिथे आणि त्याला आधार मिळतो काठांचा, माहेरचा रस्ता दाखविणार्या दुथडीचा,- न मागता.
त्याच्या आणि इतर प्रवाहांच्या विसंगतीतील सुसंगती त्याला उमजलेली असते एव्हाना. म्हणून, सर्वच सोबत्यांना बरोबर घेऊन जाण्याचा अट्टाहास; किंवा ते आपल्या बरोबरीने चालू शकत नसल्याबद्दलचा उपहास, त्याच्या हातून कधीच गळून पड्लेला असतो खोल डोहात.
पंचमहाभुतांच्या प्रचंड ताकदीपुढे; मोहात भरकट्लेल्या आयुष्याला; निस्वार्थ सावरणार्या दोन्हीही तीरांच्या मैत्रीची तीव्रता किती अधिक आहे याची प्रचिती वेडावत असते त्याला कृतज्ञतेने.
काठांमुळे तो आणि त्याच्यामुळे काठ म्हणूनच समृध्द होऊ शकतात / होऊ शकलेत युगे युगे.
"प्रवाह असो वा काठ, एकमेकांना पूरक; असे विश्वास हवेत श्वासांना,"ही जाणीव असणे महत्वाचे.
परमेश्वराजवळ सर्वांची हीच प्रर्थना कायम असो की, "जीवनाच्या,-उसळलेल्या,-घुसळलेल्या,-भोवरलेल्या प्रवाही वेदना पेलण्यासाठी; प्रत्येकाला सदाही सुफळ, समृध्द आणि सतर्क काठ मिळोत जन्मो जन्मी."
हव्यास जडो सहवासाचा
अश्वासक झुरत्या काठांचा
रंध्रांस मिळो आसीम गारवा
श्वास अमृताचा
रे जगणे शिवाय पात्र किनारे
व्याकुळ क्षेम विसावा
जुळे तराणे खुळे जरी
साकळ हा प्रेम असावा
....................अज्ञात

No comments:
Post a Comment