Sunday, 17 August 2014

"फेरा"

भरून अंबर मेघ दाटले कुंद जाहला वारा
दरवळ व्यापुन प्राजक्ताचा भिजला परिसर सारा
गूढत्वाचा रमल मनोहर स्वप्नजडित कंगोरा
खोल मनी रस अस्वादाचा अधिर विमल पट कोरा

आसुसलेले निसर्ग वैभव निरलस गोत पसारा
आत काळजाच्या कोषातील सजलेला गाभारा
त्या पूजेस्तव आतुरलेला देह देव देव्हारा
समर्पणी मी नत ; लागावा सकस कारणी फेरा

………………अज्ञात 

1 comment:

  1. Sarang Bhanage आपण सातत्याने नितांत सुंदर लिहिता. आपल्या कवितेतील आशय प्रभावी, शब्दकळा सुंदर, मांडणी सहज असते. ती नेहेमीच भावते.

    परंतु आपण कायमच ८ ओळी; अर्थात दोन चरणांमध्ये काव्य संपवता. ह्यामागचे गौड बंगाल काही कळत नाही.

    आता हीच कविता घ्या. हि जर आणखी लिहिली असती तर अधिक सुंदर आणि छान झाली असती असे वाटते.

    ReplyDelete