डोळ्यात न मावे जेही, बघ लोभ सतावे धावे
हाती न लागते काही, मी लेखणीच व्हावे
शब्दांच्या गर्भकपाळी, माझ्या हृदयीचे ठाणे
गहनी तालावर नाचे, अंतरात भावुक गाणे
मी विरघळलेल्या वेळा, माझे स्वप्नील घराणे
धुंडाळत याचक फिरतो शोधीत सुखाचे नाणे
पाउलांस मखमल सालस मिटल्या डोळ्यांत निळाई
ओघळ गंधर्व क्षणांचे रंगांना सीमा नाही
दिसते मज रोजच ऐसे पण मी निर्लिप्त प्रवाही
स्पर्शूनहि ना स्पर्शाचे अवधान मनाच्या ठायी
………. अज्ञात

No comments:
Post a Comment