कोण कोणाचा असे चाहूल दूजाला नसे
दूरचा प्राजक्त हळवा का जिवा लावी पिसे ?
ओंजळी ह्या प्रांजळांच्या नांदते ओठी हसे
किंचिताच्या चिंतनी लागून जाते वेडसे
आकळे ना स्पंदणे वृक्षांस अंकुरणे जसे
पालवीचे गूढ; त्याचे मूळ ना कोणा दिसे
जेही असते खोल गात्री अंतरी डोही वसे
लाट होते वलय; लेऊन सप्तरंगांची पिसे
श्वास श्वासांचे भुकेले विरह त्यांना आंदणे
वेड वेड्यांचे खुळे शब्दांत त्यांच्या चांदणे
भंगल्या घाटातही असते उरी आनंदणे
भावना प्रतिभा प्रवाही पूर त्यांचे देखणे
……… अज्ञात
दूरचा प्राजक्त हळवा का जिवा लावी पिसे ?
ओंजळी ह्या प्रांजळांच्या नांदते ओठी हसे
किंचिताच्या चिंतनी लागून जाते वेडसे
आकळे ना स्पंदणे वृक्षांस अंकुरणे जसे
पालवीचे गूढ; त्याचे मूळ ना कोणा दिसे
जेही असते खोल गात्री अंतरी डोही वसे
लाट होते वलय; लेऊन सप्तरंगांची पिसे
श्वास श्वासांचे भुकेले विरह त्यांना आंदणे
वेड वेड्यांचे खुळे शब्दांत त्यांच्या चांदणे
भंगल्या घाटातही असते उरी आनंदणे
भावना प्रतिभा प्रवाही पूर त्यांचे देखणे
……… अज्ञात
No comments:
Post a Comment